ओप्पोने त्यांचा एफवन प्लस बार्सिलोना एडीशन स्मार्टफोन सादर केला आहे. निळ्या व लाल रंगात असलेल्या या फोनची बॅकसाईड एटीन कॅरेट गोल्ड प्लेटेड आहे. बार्सिलोना एडिशनच्या ग्राहकांना हा फोन नक्कीच आवडेल अशी कंपनीची खात्री आहे. जूनच्या मध्यात हा फोन भारतात लाँच केला जाणार आहे.
ओप्पोचा गोल्डप्लेटेड एफवन प्लस बार्सिलोना एडीशन फोन
ब्ल्यू प्रोटेक्टीव्ह केसमध्ये असलेल्या या फोनची पुढची बाजू संपूर्ण काळी आहे. या फोनला ५.५ इंची फुल एचडी स्क्रीन, ४ जीबी रॅम, ६४ जीबी इंटरनल मेमरी १६ एमपीचा रियर तर १३ एमपीचा फ्रंट कॅमेरा, अँड्राईड ५.१ लॉलपॉप ओएस अशी फिचर्स दिली गेली आहेत. या फोनच्या होम बटणचा वापर फिंगरप्रिंट स्कॅनर सारखाही करता येतो. हा फोन चीन, सिंगापूर, इंडोनेशियासह अन्य मार्केटमध्येही लाँच केला जाणार आहे. फोनच्या किंमती अजून जाहीर करण्यात आलेल्या नाहीत.