हातात घालता येणारा मोबाईल फोन मॉक्सी

moksi
स्मार्टफोन आजच्या घडीची जीवनावश्यक वस्तू बनली असली तरी अनेकदा आकाराने मोठे असलेले स्मार्टफोन खिशात मावत नाहीत व हातात ते सतत धरणेही कष्टाचे होते. या समस्येतून युजरची सुटका करण्यासाठी आता घड्याळाप्रमाणे हातात घालता येतील असे स्मार्टफोन बाजारात येत आहेत. चीनच्या मॉक्सी ग्रुपने मॉक्सी नावाचाच हा स्मार्टफोन तयार केला आहे. हा जगातला पहिला हातात घालता येणारा फोन असल्याचा कंपनीचा दावा आहे.

या वर्षअखेर हा फोन लाँच केला जात असून त्याची किंमत आहे ५१ हजार रूपये. सुरवातीला हा फोन ब्लॅक अॅन्ड व्हाईट स्क्रीनमध्ये येणार असला तरी तो भविष्यात रंगीत स्क्रीनसह आणला जाणार आहे. लांबीला थोडा अधिक असलेला हा फोन अगदी सडपातळ आहे. त्याचा स्क्रीन थोडा अरूंद असला तरी बॅटरी मोठी आहे. हा फोल्डेबल मोबाईल स्क्रीन अॅमेझॉनच्या किडल सारखी ई इंक डिस्प्ले वाला आहे. फोनमध्ये फिचर्स खूप नाहीत मात्र तो अगदी कमी पॉवर वापरतो हा त्याचा मोठा फायदा आहे.

Leave a Comment