या मंदिरात शिवशंभोची होत नाही पूजाअर्चा

hathiya
भारतात लक्षावधी मंदिरे आहेत आणि प्रत्येकाची कांही ना कांही कथाही आहे. शंकराची अनेक मंदिरे असलेल्या उत्तराखंड राज्यात डेहराडूनपासून ७५ किमी वर असलेले बल्तोर येथील एक हातीया देवाल हे शिवमंदिर असेच वेगळ्या कारणाने प्रसिद्ध आहे. शंकराला देवांचा देव महादेव असे म्हटले जाते आणि शंकर हा भोळा सांब असल्याने भाविकांनी त्याचे नुसते स्मरण केले तरी तो त्यांच्या मनोकामना पूर्ण करतो असाही समज आहे. थोड्याशा पूजा अर्चेवर संतुष्ट होणार्‍या या देवाला म्हणूनच आशुतोष असेही नांव आहे.

बल्तोर येथले एक हातीया देवाल शिवपिंडीसह असले तरी येथे शंकराची पूजा अर्चा केली जात नाही. हे मंदिर अभिशापग्रस्त असल्याचे मानले जाते. त्यामुळे येथील शिवपिंडीवर दूध, पाण्याचा अभिषेकही केला जात नाही. या मंदिराचे स्थापत्य पाहण्यासाठी दूरदूरून पर्यटक आवर्जून येतात मात्र संकट कोसळण्याच्या भीतीने येथे पूजा मात्र करत नाहीत.

अशी कथा सांगितली जाते की राजा कत्युरीच्या काळात एका कारागिराने एकाच हाताच वापर करून एका रात्रीत हे मंदिर बांधले. पुराणातही त्याचे उल्लेख आहेत. एकाच हाताने एका रात्रीत बांधलेले मंदिर पाहायला जेव्हा लोक आले तेव्हा असे आढळले की यातील शिवपिंडी विपरित दिशेला आहे. अशा पिंडीची पूजा फलदायी होत नाहीच पण पिंडीची स्थापना दोषकारक असल्याने पूजा अनिष्टकारक ठरू शकते या समजातून येथे पूजा केली जात नाही.

Leave a Comment