भारतातील पहिला ‘एक्स’ सीरीज स्मार्टफोन सोनीने केला लाँच

sony-x-series
नवी दिल्ली – भारतात स्मार्ट फोनमधील आपला पहिला ‘एक्स’ सीरीज मोबाईल मोबाईल उत्पादनात नावजलेली कंपनी सोनी इंडियाने सोमवारी विक्रीसाठी खुला करण्याची घोषणा केली. सोनी ‘एक्सपेरिया एक्स’ आणि ‘एक्सपेरिया एक्स ए’ हे दोन नवीन तंत्राज्ञानाने युक्त उत्पादने बाजरात लवकरच आणणार आहे. या सीरीजच्या स्मार्टफोनचे वैशिष्ट्य म्हणजे दोन दिवस चालणारी बॅटरी आणि जलद फोटो काढण्याची क्षमता यात आहे.

७ जुनपासून बाजारात ‘एक्सपेरिया एक्स’ हा स्मार्टफोन ४८,९९० रुपयास तर ‘एक्सपेरिया एक्स ए’ हा जुनच्या तिसऱ्या आठवड्यात २०,९९० रुपयास बाजारात ग्राहकांसाठी उपलब्ध करण्यात येणार आहे. हा स्मार्टफोन नवीन तंत्रज्ञानाने युक्त कॅमेरा, बॅटरी आणि आकर्षक डिजाईनमध्ये आहे. तसेच हे दोन्ही फोन दोन सीमकार्डचे असून फोर जी नेटवर्कला सपोर्ट करतात. हे स्मार्टफोन सोनीच्या सर्व सेंटर, एक्सपेरिया फ्लॅगशिप स्टोअर, मोठी ईलेक्ट्रॉनिक्सची दुकाने आणि अॅमेझॉनवर ऑनलाईन मिळतील अशी व्यवस्था करण्यात आली आहे.

Leave a Comment