पीएफमधून ५० हजार रुपये काढताना कापला जाणार नाही टीडीएस

epfo
मुंबई – पीएफ खात्यातून आता ५० हजार रुपयांपर्यंतची रक्कम काढताना कोणताही टीडीएस (टॅक्स डिडक्शन अॅट सोर्स) कापला जाणार नसून आयकर कायद्यातील कलम १९२ अ मध्ये केंद्र सरकाने सुधारणा केली आहे.

आयकर खात्यातून सध्या ३० हजार रूपये काढल्यास टीडीएस कपात होत नाही. ही मर्यादा १ जूनपासून ५० हजार रुपये करण्यात आल्याने ईपीएफओ खातेदारांना मोठा फायदा होणार आहे. पीएफ खातेदाराने आत्ताच्या नियमांनुसार पॅन नंबर दिला असेल तर पीएफ खात्यातून ३० हजार रुपयांपेक्षा अधिक रक्कम काढताना १० टक्के टीडीएस कापला जातो. म्हणजेच ५० हजार रूपये काढायचे असल्याच कर्मचाऱ्याला पाच हजार रूपये कमी मिळतात. केंद्रीय भविष्य निर्वाह निधीतून (ईपीएफओ) पैसे काढल्यास १० टक्के टीडीएस कापला जाणार आहे. या निर्णयाची अंमलबजावणी १ जूनपासून सुरू होईल. ३० हजारांपेक्षा अधिक व पाच वर्षापेक्षा कमी कालावधीत पीएफमधून पैसे काढल्यास हा कर लागू होईल. केंद्रीय वित्त कायदा २०१५च्या कलम १९२ ए नुसार ही तरतूद करण्यात आली आहे.संबंधित कामगाराकडे पॅन क्रमांक असल्यास १० टक्के कर कापला जाईल. मात्र, १५ जी किंवा १५ एच फॉर्म भरून दिल्यास टीडीएस कापला जाणार नाही. मात्र, पीएफ एका ठिकाणाहून दुस-या ठिकाणी हस्तांतर केल्यास टीडीएस लागू होणार नाही.

Leave a Comment