जाहिरात क्षेत्रात निर्मितीक्षम युवकांना मोठ्या संधी

Manthan
सध्या शिक्षणाच्या अनेक संधी उपलब्ध असल्या तरी शिक्षण क्षेत्रातील पुस्तकी ज्ञानावर भर, कौशल्य विकास आणि प्रात्यक्षिक प्रशिक्षणाकडे दुर्लक्ष यामुळे शिक्षण हे विद्यार्थ्यांना नोकरीसाठी अथवा उद्योगासाठी सक्षम बनविण्यास असमर्थ ठरते. जाहिरात क्षेत्रही याला अपवाद नाही.

कला महाविद्यालयातून चार – पाच वर्षाचे अभ्यासक्रम पूर्ण करून बाहेर पडल्यावर विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष परिस्थितीचे भान येते. अॅप्लाईड आर्ट अथवा चित्रकलेसारख्या क्षेत्रात यश मिळविण्यासाठी केवळ औपचारिक शिक्षण पुरेसे असत नाही. त्यासाठी महाविद्यालयांच्या भिंतीच्या पलीकडे शिकण्यासारखे खूप असते. किंबहुना अनुभव हाच त्यांचा खरा गुरू असतो. त्याच्यासाठी अनुभव कल्पनेत उतरविणे आवश्यक असते. संवेदनशील मनाने प्रत्येक क्षण अनुभवणे आणि आपले अनुभव त्याला आपल्या कलेच्या माध्यमातून प्रत्यक्षात उतरायचे असतात.

वस्तुस्थितीचे भान नसल्याने कला महाविद्यालयातून पदवी घेऊन बाहेर पडलेले अनेक युवक बेकार आहेत. ‘अॅनिमेशन’च्या भूलथापा देणाऱ्या जाहिरातबाजीने अनेक पालक भरमसाठ फी भरून आपल्या पाल्याला अशा अभ्यासक्रमांना प्रवेश घेतात आणि त्याच्या पदरात बेकारीशिवाय काहीच पडत नाही.

सध्याचे युग हे संगणकाचे युग आहे. जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात संगणकाने आमूलाग्र बदल घडवून आणला आहे. जाहिरातीचे क्षेत्रही याला अपवाद नाही. त्यामुळे या क्षेत्रात काम करण्यासाठी कॉम्प्युटर वापरण्याचे कौशल्य आत्मसात करणे आवश्यक आहे. कल्पना कॉम्प्युटरच्या माध्यमातून कागदावर उतरविणे या क्षेत्रात आवश्यक बनले आहे.

कॉमन सेन्स, निरीक्षण शक्ती, चौफेर वाचन आपले विचार अथवा कल्पना स्पष्टपणे मांडण्याचे धाडस आणि सादरीकरणाची कला; अर्थात प्रेझेंटेशन स्कील हे गुण जाहिरात क्षेत्रात काम करण्यासाठी आवश्यक आहेत. थोडीशी कल्पनाशक्ती, भरपूर आत्मविश्वास आणि भरपूर मेहेनत करण्याची तयारी असलेला कोणताही सर्वसामान्य युवक जाहिरातीच्या क्षेत्रात यश प्राप्त करू शकतो.

दैनंदिन जीवनात येणाऱ्या लहान मोठ्या समस्या वेगळ्या पद्धतीने सोडविण्याचे कौशल्य असलेला युवक जाहिरात क्षेत्रात व्हिज्युअलायझर म्हणून काम करू शकतो. शब्दांचे खेळ करण्याची, यमक जुळवून चारोळ्या रचण्याची क्षमता असलेला कॉपी रायटर बनू शकतो. अचूक क्षण कॅमेऱ्यात टिपण्याचे कौशल्य असलेला फोटोग्राफर बनू शकतो.

जाहिरात क्षेत्राला आवश्यक असलेल्या कौशल्यांकडे औपचारिक अभ्यासक्रमात सपशेल दुर्लक्ष होत असल्यामुळे या क्षेत्रात अनेक खाजगी संस्था नाव कमावून आहेत. मुंबई आणि पुणे येथील ‘मंथन आर्ट स्कूल’ ही अशीच एक संस्था आहे. या संस्थेत क्रिएटिव्ह हिज्युअलायझेशन, अॅडव्हान्स अॅप्लाईड आर्ट्स, ग्राफीक डिझायनिंग, वेब, डिजिटल डिझायनिंग, ३ डी मॅक्स आणि कॉपी रायटींग असे अल्प मुदतीचे अभ्यासक्रम शिकविले जातात. हे अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर जाहिरात क्षेत्रात चांगल्या वेतनाच्या नोकरीची खात्री असते. त्यासाठी संस्थेकडून सहकार्य केले जाते. या अभ्यासक्रमाला कोणतीही शैक्षणिक पात्रता अथवा कलेची पार्श्वभूमी आवश्यक नाही. संस्थेच्या अनेक विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय तसेच राज्य पातळीवरील स्पर्धांमध्ये पारितोषिके मिळविली असून शेकडो जण जाहिरात क्षेत्रात उच्च पदावर काम करीत आहेत.

संपर्क: ‘मंथन आर्ट स्कूल शिवस्मृती बिल्डींग, न. म. जोशी मार्ग, करी रोड (प), मुंबई/ ७, मंगलमूर्ती कॉम्प्लेक्स, हिराबाग चौक, टिळक रस्ता, सदाशिव पेठ, पुणे

Leave a Comment