८ हजार वर्षांपूर्वींची आहे सिंधू संस्कृती !

sindhu
कोलकाता : ५ हजार ५०० वर्षांपूर्वीची प्राचीन सिंधू संस्कृती ही नसून ती ८ हजार वर्षांपूर्वीची असल्याचा दावा खरगपूर येथील भारतीय तंत्रज्ञान संस्थेच्या आणि भारतीय पुरातत्त्व खात्याच्या संशोधकांनी केला आहे. हा दावा २५ मे रोजी प्रकाशित करण्यात आलेल्या ‘नेचर’ या नियतकालिकाद्वारे करण्यात आला आहे. त्यावरून आम्ही ऑप्टिकली स्टिम्युलेटेड लिमिसेन्स तंत्र वापरून या प्राचीन कालावधीचा अभ्यास केला. त्यातून सिंधू संस्कृती ही ५,५०० वर्षांपूर्वीची नसून ती ८ हजार वर्षांपूर्वीची असल्याचे आढळून आले, अशी माहिती खरगपूर येथील भारतीय तंत्रज्ञान संस्थेच्या भू-रचनाशास्त्राचे प्रमुख अनिंद्य सरकार यांनी दिली.

मिस्र आणि मेसोपोटामियाच्या संस्कृतीच्या पूर्वी सिंधू संस्कृती विकसित झाली होती. एवढेच नाही तर संशोधकांनी १००० वर्षांपूर्वीच्या संस्कृतीचे पुरावेदेखील हडप्पा संस्कृतीतून शोधून काढले आहेत. याबाबत ‘नेचर’ शोधपत्रिकेने म्हटले आहे की, ३ हजार वर्षांपूर्वी सिंधू संस्कृती नष्ट होण्याचे कारण नैसर्गिक बदल आहे. आयआयटी खरगपूरचे भू-रचनाशास्त्रज्ञ अनिंद्य सरकार यांनी म्हटले आहे की, आम्ही सिंधू संस्कृतीच्या प्राचीन अवशेषांचा शोध घेतला आहे. आम्ही त्याच्या पडताळणीसाठी ऑफ्टिकलीस्टिम्यलॅटेड लूमनेसन्स तंत्रज्ञानाचा वापर केला आहे. तसेच त्याच्या आयुर्मानाचा शोध घेतला आहे. ती अवशेषरूपी भांडी, साहित्य हे ६ हजार वर्षांपूर्वीचे असल्याचे आढळून आले आहे. याशिवाय हडप्पा संस्कृतीची सुरुवात जवळपास ८ हजार वर्षांपूर्वीची असल्याचेही पुरावे आढळून आले आहेत. या संशोधानावरून जगभरात संस्कृतीच्या उद्गमावरून नवा वाद निर्माण होऊ शकतो.

आतापर्यंत या संस्कृतीचे पुरावे भारताच्या लोथल, धोलाविरा, ओरकालीबंगन तसेच पाकिस्तानच्या मोहनजोंदडो आणि हडप्पामध्ये मिळाले होते. सिंधू संस्कृतीचा विस्तार भत्तरताच्या मोठ्या भागात होता. मात्र या संदर्भात अधिक संशोधन, अभ्यास झालेला नाही. भारतीय पुरातत्व विभागाच्या संशोधकांनी म्हटले आहे की, आम्हाला अधिकतर माहिती इंग्रजांकडून मिळालेली आहे. इंग्रजांनी केलेल्या उत्खननावर ही माहिती आधारित आहे.

Leave a Comment