बदामाचे फायदे

badam
सर्वसाधारणपणे सुका मेव्यापासून सावध राहायचा इशारा दिला जात असतो. कारण सुका मेवा हा तेलकट आणि चरबी वाढवणारा असतो असा लोकांचा गैरसमज आहे. असे असले तरी शेंगदाणे आणि काजू वगळता अन्य प्रकारचा सुका मेवा चरबी वाढवणारा नसतो. बदाम, पिस्ता, बेदाणा, अंजीर यांच्यामध्ये चरबी वाढवणारा गुण नसतो. बदाम हा सुका मेवा लो फॅट पर्संनटेजचा आहे. परंतु त्याच्या मध्ये अनेक प्रकारची प्रथिने असल्यामुळे बदाम शरीराला फार उपयुक्त असतो. बदामाचा सगळ्यात मोठा फायदा म्हणजे क्षीण होत चाललेली स्मरणशक्ती दृढ करणे. त्याच बरोबर बदाम खाल्ल्याने डोळे तजेलदार होतात. बदाम खाण्याचे दोन प्रकार आहेत. एक आहे दिवसातून थोडेसे बदाम तसेच कोरडे खाणे आणि रात्री भिजवलेले बदाम सकाळी खाणे.

भिजवलेले बदाम सकाळी खाल्ले तर ते औषधी गुणधर्म राखून असतात. त्यांच्या सेवनाने सर्दी आणि पडसे कमी होते. रात्री झोपताना भिजवलेले बदाम आणि गरम दूध एकदम घेतले तर सर्दी ओसरते. बदामामध्ये भूक भागवण्याची मोठी ताकद असते. काही वेळा डाएटिंग करणार्‍या लोकांना याबाबत सल्ला दिला जातो. त्यांना अनेक गोष्टी खाणे वर्ज्य असते परंतु कधी कधी खूपच भूक लागते आणि खाण्यास योग्य असे पदार्थ हाताशी नसतात. अशा वेळी मोजून चांगले बारा बदाम खावेत. या बारा बदामांचे सेवन एका ब्रेकफास्टचे काम करते. पोट तर भरते. पोषक द्रव्ये तरी मिळतात परंतु कॅलरिज मात्र वाढत नाहीत.

मधुमेही व्यक्तींना बदाम खाल्ल्याने त्यांचे शर्करेचे प्रमाण नियंत्रणात राहते. बदामाची साल कोरडी असते. त्यामुळे ती काढून टाकण्याकडे लोकांचा कल असतो. परंतु त्याच्यात रक्त वाढवण्याची ताकद असते. तेव्हा बदामाचे बी त्याच्या सालीसहीत खाल्ले पाहिजे. बदामाचा दुसरा फायदा म्हणजे त्यामध्ये तांब्याचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे रक्त शुध्दीकरण होते. तिच्यामुळे कोरडी त्वचा असणार्‍यांना त्वचेचा स्निग्धपणा वाढवण्यास मदत होते. बदामाच्या सेवनाने केस गळण्याचे प्रमाण कमी होते. असे बदामाचे अनेक फायदे आहेत.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment