आता फक्त सात दिवसांत मिळणार पासपोर्ट

passport
मुंबई : मोदी सरकारला पासपोर्ट सेवेत सर्वात जास्त यश आले असून सध्याच्या घडीला देशातील जवळजवळ ७ कोटी जनतेकडे पासपोर्ट असून त्यातील दी़ड को़टी पासपोर्ट हे मोदी सरकार आल्यानंतरचे असल्याचा दावा मंत्रालयाने केला आहे.

आता आधार कार्ड, पॅन कार्ड, आणि वोटर आयडी कार्ड या फक्त ३ कागदपत्रांच्या सहाय्याने आठवड्याभरात पासपोर्ट मिळणार असल्यामुळे पासपोर्ट ऑफिसबाहेरील दलालांचे प्रमाणही कमी होईल. दिल्लीच्या पासपोर्ट अधिकाऱ्य़ाने दावा केला आहे की आता पासपोर्ट ऑफिसबाहेरील दलालांचे प्रमाण हे ६६ टक्क्यांनी कमी झाले आहे. पासपोर्ट बनविण्यासाठी आता संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन झाली आहे. याकरिता अर्जदाराला passportindia.gov.in या वेबसाईट वर जाऊन लॉग ईन करावे लागेल. त्यानंतर फक्त एकदाच पासपोर्ट ऑफिसमध्ये एक तासाकरिता जाऊन पूर्ण प्रक्रिया होईल. ज्यांना ऑनलाईन व्यवहाराचे ज्ञान नाही त्यांच्याकरिता वेगळे ऑफिस काढण्यात आले आहे. १०० रूपये देऊन लोक ऑनलाईन अर्ज करू शकतात. यानंतर तुम्हाला ७ वर्किंग डेज मध्ये पासपोर्ट अधिकाऱ्यास भेटायला बोलाविण्यात येईल.

तुमच्या कागदपत्रांत दोष असल्यास दुसरी संधी देखील दिली जाईल. पोलीस वेरीफीकेशनच्या आधीच पासपोर्ट मिळेल. पोलिसांकडून कागदपत्रांच्या पडताळणीमध्ये अनेक भ्रष्टाचाराची प्रकरणे उघडकीस आली आहेत. आता तसे घडल्यास तुम्ही ई-मेल, किंवा ट्विटर च्या माध्यमातून पासपोर्ट केंद्राशी संपर्क करू शकता.

Leave a Comment