होंडाचे सेकंड हॅण्ड बाइक शोरुम सुरु!

honda
गाझियाबाद : शनिवारी गाझियाबादमध्ये होंडा मोटरसायकल अॅण्ड स्कूटर इंडिया लिमिटेडने पहिल्या सेकंड हॅण्ड बाइक शोरुम ‘बेस्ट डील’चे उद्घाटन केले आहे.

याबाबत कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, विश्वसनीय पण सेकंड हॅण्ड बाइक ज्यांना खरेदी करायच्या आहेत कंपनीने त्यांच्यासाठी हे बेस्ट डील शोरुम सुरु केले आहे. ग्राहकांना स्वस्तात होंडाच्या दुचाकी ‘बेस्ट डील’मध्ये खरेदी करता येणार आहेत. याबरोबर जुन्या दुचाकी बदलून नवीन किंवा होंडाची सेकंड हॅण्ड बाइक खरेदी करता येऊ शकते. बेस्ट डीलमध्ये ग्राहकांच्या सुविधा लक्षात घेऊन सेकेंड हॅण्ड गाडी विकणाऱ्या मालकाच्या गाडीचे कागदपत्र आणि नव्या ग्राहकाच्या वाहनाची ओनरशीप याचे लवकरात लवकर ट्रान्सफर देण्याचीही हमी देते. सेकंड हॅण्ड वाहनांनमुळे वाहन बाजाराला एक व्यवस्थित रचना मिळू शकते असे होंडाला वाटते.

याबाबत अधिक महिती देताना होंडा मोटरसायकलचे वरिष्ठ उपाध्यक्ष यदविंदर सिंह गुलेरिया म्हणाले की, आम्हाला असे दिसून आले की, मागील १० वर्षापासून फार दुचाकी बदलल्या न गेल्यामुळे ग्राहकांचा बदलत्या सवयीनुसार, आम्हाला भविष्यात सेकंड हॅण्ड दुचाकीमध्ये मोठी गुंतवणूक दिसून येत असल्यामुळेच ‘बेस्ट डील’ हे आम्ही ग्राहकांसाठी घेऊन आलो आहे. तसेच याचा लवकरच देशभरातही विस्तार करु.

Leave a Comment