‘सॉफ्ट बँक’ भारतात करणार १० अरब डॉलरची गुंतवणूक

Soft-Bank
टोक्यो: जपानमधील दूरसंचार आणि इंटरनेट क्षेत्रातील आघाडीची कंपनी असलेल्या ‘सॉफ्ट बँक’ने आगामी १० वर्षात भारतात १० अरब डॉलरची गुंतवणूक करण्याची तयारी दर्शविली आहे. ही गुंतवणूक दूरसंचार आणि इंटरनेटसह सौर उर्जा प्रकल्पातही असणार आहे.

जपानमधील सर्वात मोठ्या दूरसंचार कंपनीची मालकी आणि अमेरिकेच्या ‘स्प्रिंट कॉर्प’ या कंपनीत निर्णायक आता असलेल्या ‘सॉफ्ट बँक’ने आतापर्यंत भारतात २ अरब डॉलरची गुंतवणूक केली असून या नंतरच्या टप्प्यात कंपनी ३५ कोटी डॉलर सौर उर्जा प्रकल्पात गुंतविणार आहे.

भारतात गुंतवणुकीला चांगले भविष्य असून यापुशील काळात ‘सॉफ्ट बँक’भारतातील गुंतवणूक वेगाने वाढवेल; अशी ग्वाही कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी मासायोशी सोन यांनी दिली आहे.

Leave a Comment