झेडटीईचा एक्सॉन सेव्हन स्मार्टफोन लाँच

axon
झेडटीईने त्यांचा नवा फ्लॅगशीप स्मार्टफोन एक्सॉन सेव्हन अल्युमिनियम बॉडी सह सादर केला आहे. हा फोन अँड्राईड मार्शमेलो ६.० वर आधारित मायफेव्हर यूआय ४.०ला सपोर्ट करणार असून अँड्राईड एन लाँच झाल्यानंतर तो अपडेट करून मिळणार आहे. हा फोन तीन व्हेरिएंटमध्ये सादर केला गेला आहे व त्याच्या किंमती ३० हजारांपासून ४२ हजार रूपयांपर्यंत आहेत. जूनपासून त्याची ऑनलाईन व ऑफलाईन विक्री सुरू होणार असून तो सध्या फक्त चीनमध्ये मिळू शकेल. लवकरच हा फोन अमेरिकेतही लाँच केला जाईल.

हा फोन ड्युअल सिम असून त्यासाठी हायब्रिड सिमकार्ड आहे.त्याला ५.५ इंचाचा क्यूएचडी एमोलेड स्क्रीन, ४ जीबी रॅम, २० एमपीचा एलईडी फ्लॅशसह रियर तर ८ एमपीचा फ्रंट कॅमेरा दिला गेला आहे. इंटरनल मेमरी ६४ जीबी आहे व ती मायक्रो कार्डच्या सहाय्याने १२८ जीबी पर्यंत वाढीवण्यची सुविधाही आहे. क्वीक चार्ज टेक्नॉलॉजी असलेली ३१४० एमएएचची बॅटरी, फिंगरप्रिंट सेन्सर, फोर जी, वायफाय, ब्ल्यू टूथ सेन्सर अशी त्याची अन्य फिचर्स आहेत.

Leave a Comment