कॅनडातील हायवे ऑफ टियर्सवर बेपत्ता झाल्यात अनेक महिला

highway-of-tears
टोरंटो – मागील काही दशकात मोठय़ा संख्येने महिला कॅनडाच्या ब्रिटिश कोलंबिया भागात स्थित महामार्ग क्रमांक १६ वरून बेपत्ता झाल्या आहेत. कित्येक महिन्यानंतर अनेकांचे मृतदेह सापडले तर काहींचा अनेक वर्षांनंतरही थांगपत्ता लागलेला नाही. पोलिसांनी या मार्गावर रितसर फलक लावून इशारा दिला आहे. या फलकावर हा ‘हायवे ऑफ टियर्स’ आहे, महिलांनी येथून जाऊ नये, असा संदेश लिहिला आहे.

या महामार्गावरुन बेपत्ता झालेल्या बहुतेक महिला कॅनडाच्या स्थानिक वंशाच्या असून बेपत्ता झालेल्या महिलांच्या कुटुंबियांनी पोलीस या स्थानिक महिलांसोबत भेदभाव करतात असल्याचा आरोप केला. कृष्णवर्णिय महिला बेपत्ता झाल्यानंतर आत्महत्या, मादक पदार्थांचे अतिसेवन आणि आपणहून परततील अशी कारणे पोलिसांकडून दिली जातात. तर श्वेत महिला बेपत्ता झाल्यास पोलीस त्वरित सक्रिय होतात असा आरोप होत आहे.

अत्यंत घनदाट असे जंगल महामार्गाला लागून असल्यामुळे महिला बेपत्ता झाल्यानंतर त्यांना शोधणे जवळपास अशक्य आहे. तर महामार्गाच्या कडेला वस्ती अत्यंत कमी आहे. प्रिन्स रुपर्ट ते प्रिन्स जॉर्जपर्यंत जाणारा हा मार्ग प्रशांत महासागराच्या जवळ आहे. मागील २० वर्षात १२०० महिला बेपत्ता झाल्या आहेत. तर नेटिव्ह वुमेन असोसिएशन ऑफ कॅनडानुसार ही संख्या ४ हजार पर्यंत असू शकते.

Leave a Comment