रिलायन्सचा सर्वात स्वस्त 4G स्मार्टफोन लाँच

reliance
नवी दिल्ली : भारतात एक नवीन स्वस्त 4G स्मार्टफोन लाइफ फ्लेम ४ रिलायन्स रिटेलने लाँच केला आहे. या स्मार्टफोनची किंमत ३ हजार ९९९ रूपये आहे. या फोनचे वैशिष्टय़ म्हणजे यात VoLTE तंत्रज्ञान दिले आहे, ज्यामुळे एचडी कॉलिंग करता येईल.

काय आहेत या स्मार्टफोनचे फीचर्स :
यात अँड्रॉईड ५.१ लॉलीपॉप ऑपरेटिंग सिस्टीम देण्यात आले असून हा डय़ुअल सिम आहे. ज्यात २जी आणि ४जी सुविधा देण्यात आल्या आहेत. या फोनचा डिस्प्ले ४ इंचाचा आहे. यात १.५ GHz क्वाडकोअरचा प्रोसेसर आणि ५१२ एमबी रॅम तसेच ८ जीबी इंटरनल मेमरी देण्यात आली आहे. याचा फ्रंट कॅमेरा ०.३ मेगापिक्सल आणि बॅक कॅमेरा २ मेगापिक्सलचा आहे. यात ४जी, VoLTE, वायफाय, ब्ल्यूटूथ, एफएम रेडिओ, मायक्रो यूएसबी पोर्ट अशा कनेक्टीव्हिटी देखील देण्यात आल्या आहेत. रिलायन्स जियो या आपल्या तंत्रज्ञानाच्या लाँचिंगच्या आधी कंपनी ४जी स्मार्टफोन लोकांपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न करत आहे.

Leave a Comment