एकाचवेळी २२ उपग्रहांचे इस्रो प्रक्षेपण करणार

isro
श्रीहरीकोटा : भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) जून महिन्यात एकाच वेळी तब्बल २२ उपग्रहांचे प्रक्षेपण करणार आहे. इस्रोचे अध्यक्ष किरण कुमार यांनी नुकत्याच झालेल्या ‘रियुझेबल लाँच व्हेकल (आर.एल.वी.)’च्या यशस्वी उड्डाणचाचणीनंतर पुढील कामगिरीवर आमचे लक्ष केंद्रित राहणार आहे, या व्यतिरिक्त पुढील महिन्यात २२ उपग्रहांचे प्रक्षेपणही आम्ही करणार आहोत. यामध्ये नकाशाशास्त्रीय उपग्रहांच्या मालिकेतील एका उपग्रहाचा समावेश असल्याचे सांगितले. फेडरेशन ऑफ कर्नाटका चेम्बर्स अ‍ॅन्ड इंडस्ट्री (एफ.के.सी.सी.एल.)ने आयोजित केलेल्या कार्यक्रमात पत्रकारांशी बोलताना हा कार्यक्रम जून महिन्याच्या शेवटी घेण्यात येणार असून यात २२ पैकी ३ उपग्रह हे भारतीय बनावटीचे असून उर्वरित १९ व्यावसायिक असल्याची माहिती त्यांनी दिली.

दरम्यान, सोमवारी ‘रियुझेबल लाँच व्हेकल (आर.एल.वी.) स्वदेशी’ चे इस्रोने श्रीहरिकोटा, आंध्र प्रदेश येथुन यशस्वी उड्डाणचाचणी करून ‘रियुझेबल रॉकेट’ जे अवकाश प्रवेशासाठी लागणाऱ्या खर्चात मोठ्याप्रमाणावर कपात करेल अशा प्रकारात महत्त्वाचे पाऊल टाकले आहे.

Leave a Comment