७४ वर्षांच्या आजोबांनी अंगावर बनविले ३६६ देशांचे झेंड्याचे टॅटू

har-prakash
नवी दिल्ली : या जगात वेगवेगळ्या स्वभावाचे व्यक्ती असून प्रसिद्धीसाठी कोणी कोणत्याही थराला जाऊ शकते. याचे जिवंत उदाहरण सापडले आहे राजधानी दिल्लीत. दिल्लीत राहणारे ७४ वर्षीय हर प्रकाश ऋषी यांच्या २० विक्रमांची दखल गिनिज बूक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डने घेतली आहे. ते स्वतःचे गिनिज ऋषी नाव सांगतात. इतकेच नाही तर त्यांची पत्नीही गिनिज बूक ऑफ वर्ल्ड रिकॉर्ड होल्डर असून त्यांची मुलेही त्यांना या सर्व प्रकारासाठी खूप साथ देतात.

एकीकडे लोक टॅटू बनविण्याच्या वेदना सहन करू शकत नाही. पण या व्यक्तीला पाहिल्यावर तुम्हांला आश्चर्याचा धक्का बसेल. ५०० पाईप आणि ५० जळत्या मेणबत्त्या ठेवू शकतील या विक्रमासाठी त्यांनी आपले संपूर्ण दात काढले आहेत. ऋषी यांच्या नावावर २० गिनिज रेकॉर्ड आहे. पहिले रेकॉर्ड त्यांनी १९९० मध्ये केले होते. त्यांनी दोन मित्रांसह १००१ तास स्कूटर चालवली होती. ३९ सेकंदात टॉमॅटो केचअपची बाटली प्यायली होती. नंतर हे रेकॉर्ड एका जर्मन व्यक्तीने ३२ सेकंदात तोडले होते. त्यांच्या नावावर अनेक लिम्का बूक ऑफ रेकॉर्ड आणि वर्ल्ड रेकॉर्ड आहेत. जगातील सर्वात छोटे मृत्यूपत्र लिहिण्याचा विक्रम ऋषी यांच्या नावावर आहे. All to Son. असे मृत्यूपत्र लिहिले आहे.

Leave a Comment