अशी ही फ्लिपकार्टची बनवाबनवी ?

flipkart
मुंबई : आयआयटी प्लेसमेंटमधून डिसेंबर २०१५मध्ये लाखो रुपयांची सॅलरी पॅकेज मिळालेल्या ९ विद्यार्थ्यांना सध्या ई-कॉमर्स कंपनी फ्लिपकार्टने मोठे टेन्शन दिले आहे. कंपनीने या विद्यार्थ्यांना नोकरी देण्याचं आश्वासन दिले, पण अजून कंपनीत रूजू करून घेतलेले नाही.

जून २०१६मध्ये हे विद्यार्थी आधी ठरल्यानुसार फ्लिपकार्टमध्ये जॉईन होणार होते, पण फ्लिपकार्टने आता ही जॉईनिंग डेट डिसेंबर २०१६पर्यंत पुढे ढकलली आहे. आयआयटीने हा विद्यार्थ्यांचा विश्वासघात असल्याचा आरोप केला आहे. या विद्यार्थ्यांना फ्लिपकार्ट नुकसानभरपाईपोटी दीड लाख रूपयांचा बोनस देणार आहे. इतर कंपन्यांच्या लाखो रुपयांच्या ऑफर्स सोडून विद्यार्थ्यांनी फ्लिपकार्टची निवड केली. यापैकी अनेकांना एज्यूकेशन लोन भरायचे असल्यामुळे त्यांचा संताप वाढला आहे.

याबाबत फ्लिपकार्टच्या वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार, विद्यार्थ्यांची जॉईनिंग कंपनीत व्यवस्थापकीय बदल होत असल्यामुळे जून २०१६ ऐवजी डिसेंबर २०१६ मध्ये करण्याचा निर्णय कंपनीने घेतला असून याबदल्या विद्यार्थ्यांना १.५ लाख रुपये बोनस दिला जाणार आहे. पण सहा महिन्यांच्या तुलनेत ही किंमत कमी असल्याने नाराजी व्यक्त होत आहे. या दिरंगाईची मोठी किंमत फ्लिपकार्टला मोजावी लागू शकते. कारण यापुढे आयआयटी प्लेसमेंटच्या पहिल्या दिवशी फ्लिपकार्टला न बोलावण्याचा निर्णय आयआयटी घेणार असल्याचे वृत्त आहे.

Leave a Comment