५ लाख कर्करोग पीडितांचा पैशांअभावी मृत्यू

cancer
पॅरिस : दोन वर्षांमध्ये जवळपास ५ लाख कर्करोग पीडितांना जगात आलेल्या आर्थिक संकटामुळे आपला जीव गमवावा लागला. आर्थिक संकटामुळे हे पीडित स्वतःवर उपचार करून घेऊ शकले नाहीत, असे एका अहवालात नमूद करण्यात आले आहे. अहवालात या लोकांना नोकरी गमवावी लागणे हे देखील कारण सांगण्यात आले. ओईसीडीचा (ऑर्गनायझेशन फॉर इकॉनॉमिक को-ऑपरेशन अ‍ॅण्ड डेव्हलपमेंट) अहवाल २००८-२०१० च्या दरम्यान झालेल्या संशोधनावर आधारित आहे. फक्त २ वर्षांमध्ये कर्करोगाच्या जवळपास ५ लाख पीडितांचा मृत्यू फक्त योग्यवेळी उपचार करू शकले नाहीत असे या अहवालात म्हटले आहे.

यूरोपीय संघादरम्यान जवळपास १६००० कर्करोग पीडितांच्या मृत्यूची नोंद झाली. तर फक्त अमेरिकेत हे प्रमाण १८००० एवढे होते. फ्रान्समध्ये या कालावधीत जवळपास १५०० कर्करोगांचा मृत्यू रकमेच्या कमरतेमुळे झाला. २०१२ मध्ये जवळपास ८.२ दशलक्ष लोकांच्या मृत्यूचे कारण कर्करोग होता. २००८-२०१० दरम्यान आलेल्या मंदी आल्याने अनेक जण बेरोजगार झाले होते, असे अध्ययनकर्ते मुरूथप्पू यांनी आपल्या अहवालात म्हटले आहे.

बेरोजगारीच्या तावडीत सापडलेल्या कर्करोग पीडितांची स्थिती आणखीनच दयनीय झाली होती. यामुळे ते स्वतःवर योग्य आणि पूर्ण उपचार करू शकले नाहीत आणि यामुळे त्यांचा मृत्यू झाला होता. याच्या अध्ययनासाठी डब्ल्यूएचओ आणि जागतिक बँकेच्या आकडेवारीचा देखील वापर करण्यात आला. यात जगाच्या ७० देशांना समाविष्ट करण्यात आले होते.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment