स्मार्टसिटीत अकौंट हॅक, डेटा चोरीचे नाही भय

smart-city
केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी स्मार्ट सिटी योजनेत सामील असलेल्या शहरातील नागरिकांना त्यांची अकौंट हॅक होण्याची अथवा डेटा चोरी होण्याची अजिबात भीती राहणार नाही असे समजते. ही शहरे सायबर सिक्युरिटीने परिपूर्ण करण्यात येणार आहेत व त्यासाठी स्वतंत्र सायबर सिक्युरिटी मॉडेल फ्रेमवर्क तयार करण्यात आल्याचे केंद्रीय शहरी विकास मंत्रालयाच्या अधिकांर्यांमनी सांगितले. नेसकॉमच्या मदतीने तयार केले गेलेले हे मॉडेल पहिल्या टप्प्यात स्मार्टसिटी यादीत असलेल्या शहरांच्या आयुक्तांना पाठविले गेले आहे. आयटी आणि अॅप संदर्भातील प्रस्तावांसांठी निविदा मागविताना हे मॉडेल विचारात घेऊनच मागविण्याच्या सूचनाही दिल्या गेल्या आहेत.

२५ जूनपासून पहिल्या टप्प्यातील स्मार्टसिटी प्रकल्प सुरू होणार आहेत. या शहरातील सर्व सेवा आयटीवर आधारित असतील. त्यात पाणी, वीज, वाहतूक, रहदारी, ई गव्हर्नन्स, ऑनलाईन परवानग्या, पेमेंटस यांचाही समावेश असल्याने सायबर हल्ल्यांचा धोका निर्माण होऊ शकतो व त्यासाठीच सायबर सुरक्षेचे सर्व उपाय केले जाणार आहेत.

Leave a Comment