सूर्यावरील राक्षसी छिद्र नासाला दिसले

nasa
वॉशिंग्टन : ‘नासा’ या अमेरिकेच्या अवकाश संशोधन संस्थेला सूर्याच्या पृष्ठभागावर राक्षसी आकाराचे ‘छिद्र’ दिसून आले असून हे राक्षसी आकाराचे छिद्र १७ ते १९ मे या कालावधीत सूर्यावर आढळले आहे. यामागील कारण मात्र अद्याप अस्पष्ट आहे. नासाच्या सोलर डायनॅमिक ऑब्जव्र्हेटरीला हा प्रकार व्हीडीओत कैद करता आला आहे. सूर्याच्या पृष्ठभागावरील काही भागात ‘सोलर मटेरियल’ म्हणजे उष्णता निर्माण करण्यासाठी सूर्यातील घटक कमी असल्याने अशा भागांतील उष्णता फारच कमी असते. त्यामुळे सूर्याच्या इतर भागांपेक्षा हा भाग काळा दिसतो. या भागांना ‘कोरोनल व्होल,’ असे शास्त्रीय नाव आहे.

पण ‘नासा’ ला आढलेले सध्याच्या कोरोनल व्होलचा आकार फारच मोठा आहे. पण याबद्दल भीती वाटण्याचे कारण नाही, असे नासाच्या प्रवक्त्यांनी म्हटले आहे. पण असे ‘व्होल’ का निर्माण होतात याची मात्र माहिती उपलब्ध नाही. पण याच्या अभ्यासातून पृथ्वीच्या भवती असणारे अवकाशाचे पर्यावरण कसे हे समजण्यासाठी याचा अभ्यास आवश्यक आहे,’ असे नासाने म्हटले आहे.सूर्याच्या पृष्टभागावर चुंबकीय क्षेत्र भागात अशा ‘व्होल‘वर जास्त प्रभावी असते. शिवाय या भागांत सौर वादळांची तीव्रताही अधिक असते,’ असे त्यांनी सांगितले आहे.

Leave a Comment