साकार होणार हायस्पीड इंटरनेटचे स्वप्न

high-speed-internet
वॉशिंग्टन : संपूर्ण जग आज इंटरनेटवर अवलंबून असून ब-याचदा इंटरनेटच्या स्पीडची अडचण येते. मात्र, आता लवकरच हाय स्पीड इंटरनेटचे स्वप्न साकार होणार आहे. यासाठी मायक्रोसॉफ्ट आणि फेसबुक या जगातील दोन दिग्गज कंपन्यांनी पुढाकार घेतला असून, वेगवान इंटरनेट सेवा उपलब्ध करून देण्यासाठी ते अ‍ॅटलाँटिक महासागरात ६ हजार ६०० कि.मी. लांब केबल अंथरणार आहेत. त्यासाठी त्यांनी योजना आखली आहे.

सर्वप्रथम अमेरिका आणि युरोपला या केबलच्या माध्यमातून जोडले जाईल. त्यानंतर अन्य देशात त्याचा विस्तार केला जाईल. याचा फायदा भारतासारख्या देशालाही मिळणार आहे. एमएआरईए केबलच्या माध्यमातून ग्राहकांना हायस्पीड आणि विश्वासार्ह इंटरनेट कनेक्शनची मागणी पूर्ण होणार आहे. ऑगस्ट २०१६ पासून या प्रकल्पाचे काम सुरू केले जाणार असून ऑक्टोबर २०१७ पर्यंत ते पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे, असे मायक्रोसॉफ्ट कंपनीच्या वतीने सांगण्यात आले. इंटरनेट सेवेची वाढती मागणी लक्षात घेऊन हाय स्पीड इंटरनेटसाठी हे पाऊल उचलण्याचा निर्णय घेताल आहे. त्यासाठी मायक्रोसॉफ्ट आणि फेसबुकने संयुक्तरित्या काम करण्याचे ठरविले असून, या इंटरनेट केबलची क्षमता सध्याच्या केबलच्या अधिक पटीने असेल.

Leave a Comment