ट्रायम्फची थ्रक्सटन आर ३ जूनला भारतात येणार

thruxton
ब्रिटनची मोटर कंपनी ट्रायम्फ ची नवी बाईक थ्रक्सटन आर भारतात लाँच केली जात आहे. ही बाईक ३ जूनला सादर केली जाईल असे सूत्रांकडून समजते. ट्रायम्फची भारतात लाँच होत असलेली ही तिसरी बाईक आहे. यापूर्वी कंपनीने स्ट्रीट ट्विन व टी १२० ही मॉडेल्स सादर केली होती. या तीनही बाईक दिल्लीच्या ऑटो एक्स्पो २०१६ मध्ये सादर केल्या गेल्या होत्या.

ट्रायम्फची थ्रक्सटन आर लूक्स आणि परफॉर्मन्स बाबत अतिशय दमदार आहे. या बाईकला १२०० सीसीचे पॅरलल ट्विट इंजिन सहा स्पीड गिअरबॉक्ससह दिले गेले आहे. बाईकला ब्रेम्बो मोनोलॉक्स ब्रेकस आहेत आणि तिचा एक्झॉस्टही गाडीच्या एकूण रूपाला साजेसा देखणा डिझाईन केला गेला आहे. टेल लँप युनिट बाईकच्या कलासी लूकला आणखी क्लासिक बनविणारे आहे. ही बाईक डायब्लो रेड, सिल्व्हर आईस व मॅट ब्लॅक अशा तीन रंगात आहे. बाईकची किंमत आहे १० लाख रूपये.

Leave a Comment