ओला घडवणार अवघ्या २० रुपयात BMWची सफर

ola
मुंबई: आपल्या कमी किंमतीतील कॅबच्या पॉलिसीमध्ये आता ओला कंपनीने महागड्या कारचाही समावेश केला आहे. BMW, जग्वार आणि मर्सडीज या कारचा या महागड्या कारमध्ये समावेश आहे. या कारमधून एक किमी फिरण्यासाठी अवघे २० रुपये मोजावे लागणार आहे. तर ५ किमी फिरण्यासाठी २०० रु. मोजावे लागतील.

याबाबत ओला कंपनीचे चीफ मार्केटिंग ऑफिसर रघुवेश सरुप यांनी दिलेल्या माहितीनुसार, कमी वयाच्या एंटरप्रायजेसची वाढती संख्या आणि युवकांची वाढती मागणी यामुळे आम्ही ही नवी सेवा सुरु केली आहे. ही सुविधा सध्या मुंबईत सुरु करण्यात आली असून मुंबई लोकेशन अॅप सुरु केल्यानंतर ग्राहकांना Lux आयकोन पाहायला मिळणार आहे. त्यावर क्लिक केल्यानंतर लग्जरी कार अवघ्या काही वेळात मिळू शकते. दिल्लीमध्ये याआधी ऊबरचे “Uber Supercars” कॅम्पेन सुरु झाले. ज्यामध्ये ऑडी, हमर यासारख्या कारने ग्राहकांना फ्री राईड देण्यात आली होती.

Leave a Comment