अवघ्या ८,७९९ रूपयात लावाचा पहिला ४जी टॅबलेट

lava
नवी दिल्ली – आपला पहिला ४जी टॅबलेट ‘आयवोरी एस ४जी’ लावा या भारतीय मोबाइल कंपनीने भारतीय बाजारात आणला आहे. हा टॅबलेट ग्राहकांना ८,७९९ इतक्या कमी किंमतीला मिळणार आहे.

काय आहेत टॅबलेटचे फीचर – याची स्क्रीन ७ इंचाची असून यात अॅन्डॉइड ५.१ लॉलीपॉप ऑपरेटिंग सिस्टम त्याचबरोबर १ GHz क्वाडकोर प्रोसेसर देण्यात आला आहे. यात १ जीबी रॅम तसेच १६ जीबी इटरनल मेमरी देखील देण्यात आली आहे. याचा रिअर कॅमेरा ५ मेगापिक्सेलचा तर फ्रंट कॅमेरा ३.२ मेगापिक्सेलचा देण्यात आला आहे.

Leave a Comment