लवकरच बाजारात दाखल होणार एचटीसीचा महागडा स्मार्टफोन

htc-10
नवी दिल्ली – तैवानची एचटीसी मोबाईल कंपनी सॅमसंग गॅलक्सी एस७/एस७ एज, आयफोन ६एस/६एस आणि एलजी जी५ या मोबाईल कंपन्यांशी स्पर्धा करण्यासाठी लवकरच नवीन आयफोन बाजारात आणणार आहे.

एचटीसी १० हा स्मार्टफोन महागडा असून, बाजारात याची किंमत ५२ हजार ९९० रुपये इतकी असून त्याचबरोबर कंपनीने एचटीसी वन एक्स९, एचटीसी डिझायर ८२८, एचटीसी ८२५, एचटीसी ८३० आणि एचटीसी ६३० हे फोन लाँच केले आहेत. मात्र, ५ जूनपासून प्रत्यक्ष विक्रीला सुरुवात होणार आहे. लाँच करण्यात आलेले फोन्स भारतातील तरुणांना आवडतील, अशी आशा एचटीसीच्या दक्षिण आशियाचे अध्यक्ष फैजल सिद्दिकी यांनी पत्रकारांसमोर व्यक्त केली.

एचटीसी १० या स्मार्टफोनची आकर्षक डिझाईन आहे. ५.२ इंच असलेल्या या फोनचा कॅमरा एचडी (२५६०x१४४० पिक्सलमध्ये) आहे. गोरिला ग्लास प्रोटेक्शनसह सुपर एलसीडी ५ असे या फोनचे फिचर आहे. तो कार्बन ग्रे आणि टोपाझ गोल्ड रंगात उपलब्ध करण्यात आला आहे.

Leave a Comment