क्लाऊड स्टोरेजवाला स्मार्टफोन भारतात लाँच

nexbit
मुंबई – आता मोबाईल फोनमधील स्टोअरेजची समस्या दूर होणार असून रॉबिन कंपनीने आपला बहुप्रतिक्षित क्लाउड स्टोरेज स्मार्टफोन नेक्सबीट अखेर भारतामध्ये लाँच केला असून या स्मार्टफोनचे वैशिष्टय म्हणजे यात तब्बल १०० जीबी मोफत क्लाऊड स्टोअरेजची सुविधा यामध्ये देण्यात आली आहे.

गेल्या काही महिन्यांपासून नेक्सबीट रॉबिन हा स्मार्टफोन चर्चेत होता. या स्मार्टफोनची किंमत १९,९९९ रुपये आहे. ३० मे पासून हा फोन फ्लिपकार्टवर विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे. यासाठी प्री-रजिस्ट्रेशन सुरु झालेले आहे.

सध्या मायक्रो एसडी कार्डच्या मदतीने मेमरी वाढविण्यात येते. मात्र, यासाठीही काही मर्यादा असतात. पण आता या नव्या स्मार्टफोनमुळे तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. या स्मार्टफोनमधील डेटा आपोआप क्लाउडवर स्टोअर करेल. इतकेच काय तर फोनवरील अॅपही क्लाउडवर स्टोर केले जातील. यामध्ये ३२ जीबी इंटरनल मेमरी आणि १०० जीबी क्लाउड स्टोरेज देण्यात आले आहे. या मॉडेलमध्ये ग्राहकांना १०० जीबी इतके क्लाऊड (ऑनलाईन) स्टोअरेज मोफत मिळणार आहे. तर यापुढील स्टोअरेज अल्प मुल्यात मिळणार आहे.

जगातील पहिला क्लाऊड स्टोअरेजयुक्त असा नेक्सबीट हा स्मार्टफोन आहे. यामध्ये स्मार्टफोनवरील फोटोज, व्हिडिओज हे पहिल्यांदा इंटरनेटवर सेव्ह होतात आणि त्यानंतर हा स्मार्टफोन वाय-फाय नेटवर्कशी कनेक्ट झाल्यानंतर व्हिडिओज, फोटोज हे क्लाऊड अकाऊंटवर ट्रान्सफर होतात.

Leave a Comment