आला जगातला पहिला रोबो मोबाईल

robohon
जपानी कंपनी शार्प ने इंजिनिअर ताकाहाशी यांच्या सहकार्याने जगातला पहिला रोबो मोबाईल रोबोकॉन बाजारात आणला आहे. हा फोनसारखा वापरता येईलच पण तो तुमच्याशी गप्पा मारेल, डान्स करेल व तुमच्या खिशात आरामात मावेल. गुरूवारपासून या रोबो मोबाईलची विक्री सुरू झाली असून त्याची किंमत आहे १८०० डॉलर्स म्हणजे १ लाख २० हजार रूपये. मानवी आकृतीप्रमाणे हा फोन बनविला गेला आहे.

इंजिनिअर ताकाहाशी यांनी यापूर्वी अंतराळवीर किरोबो बनविला होता. शार्पने टोक्योमध्ये रोबोहोन कॅफे उघडला असून तेथे ७ जूनपर्यंत हा रोबो पाहता येणार आहे. दर महिन्याला या प्रकारचे पाच हजार रोबो मोबाईल तयार केले जात आहेत. या रोबो मोबाईलचा प्रोजेक्टर म्हणूनही उपयोग करता येणार आहे. त्यावर व्हिडीओ, मॅप, फोटो पाहता येतील. हा रोबो मोबाईल १९ सेंमी आहे. यातील फ्रंट कॅमेर्‍याच्या सहाय्याने तो लोकांचे चेहरे ओळखून त्यांना नावाने हाकही मारू शकतो.

Leave a Comment