मारुती सुझुकीच्या आणखी एका गाडीची ‘गॅरेज वापसी’

maruti
मुंबई: बाजारातील आपल्या दोन मॉडेल्सच्या गाड्या ऑटोमोबाईल कंपनी मारुती सुझुकीने परत मागवल्या असून मारुती बेलेनो मॉडेलच्या तब्बल ७५ हजार ४१९ तर मारुती डिझायर कंपनीच्या १ हजार ९६१ गाड्या कंपनीने परत मागवल्या आहेत.

याबाबत कंपनीच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बेलेनो मॉडेलच्या एअरबॅग आणि डिझायर मॉडेलची इंधन प्रणाली सदोष असल्याचे आढळून आल्याच्या काही तक्रारीही कंपनीकडे आल्या होत्या. यासाठी कंपनीने हे पाऊल खबरदारीचा उपाय म्हणून उचलल्याचे वृत्त आहे. सर्व ग्राहकांना मारुती एअरबॅग सॉफ्टवेअर अपग्रेड करुन देणार आहे. मारुती सुझुकीने आपली नवी बेलेनो कार २०१५च्या ऑक्टोबरमध्ये लाँच केली होती. फक्त बेलेनो नाही तर या ८ डिसेंबर २०१४ आणि १८ फेब्रुवारी २०१५ला तयार झालेल्या ऑल्टो के-१० या कार देखील परत बोलावल्या होत्या.

Leave a Comment