जन्मताच या बालिकेने नोंदविले रेकॉर्ड

child
कर्नाटकातील एक नवजात बालिकेने जन्मतःच रेकॉर्ड नोंदविले आहे. ही मुलगी देशातील सर्वात वजनदार जन्मजात बालिका ठरली अ्रसून तिचे वजन आहे ६.८ किलो. तिच्या या वजनाने डॉक्टरच नाही तर तिची आई नंदिनीही हैराण झाली आहे. कर्नाटकातील हासन गावी नंदिनीने सरकारी रूग्णालयात या बालिकेला जन्म दिला असून डॉक्टर वेंकटेश राजू यांनी त्यांच्या २५ वर्षांच्या वैद्यकीय सेवेत प्रथमच इतक्या वजनाचे बाळ जन्माला आल्याचे सांगितले. सिझेरियन करून या बालिकेचा जन्म झाला.

डॉ. राजू यांच्या मते ही बालिका केवळ भारतातीलच नव्हे तर जगातील सर्वात वजनदार बालिका असावी. तिची आई नंदिनी १९ वर्षांची असून वजन ९४ किलो व उंची ५ फूट ९ इंच आहे. आपले बाळ हेल्दी असणार याची तिला खात्री होती मात्र ते इतके वजनदार असेल असे मात्र तिला वाटले नव्हते. जन्मजात बाळाला मधुमेह असेल तर बाळाचे वजन जास्त भरते. म्हणून नवजात बालिकेला आयसीयू मध्ये ठेवून तिच्या सर्व प्रकारच्या चाचण्या केल्या असता हे बाळ अगदी नॉर्मल व स्वस्थ असल्याचे आढळले आहे.

Leave a Comment