एकही भारतीय कंपनी फोर्ब्सच्या यादीत नाही

forbes
नवी दिल्ली : सध्या चीनची आर्थिक स्थिती डबघाईला आली असली तरी त्यांच्या बँका चांगले काम करताना दिसत आहेत. चीनच्या आयसीबीसीला जगातील सर्वात मोठी खासगी कंपनी फोर्ब्स ग्लोबलच्या वार्षिक यादीमध्ये म्हटले आहे. भारतातील एकाही कंपनीचा या यादीमध्ये समावेश नाही. फोर्ब्स ग्लोबलच्या यादीमध्ये ज्या कंपन्यांचा समावेश करण्यात आला आहे, त्यामध्ये महसूल, नफा, ऍसेट आणि बाजारमूल्य यांना विचारात घेण्यात आले आहे. या कंपन्यांची किंमत ३५ लाख कोटी डॉलर, नफा २.४ लाख कोटी डॉलर आणि ऍसेट १६२ लाख कोटी डॉलरपेक्षा जास्त आहे.

Leave a Comment