मोबाईल फोनचे उत्पादन मायक्रोसॉफ्ट थांबवणार

microsfot
हेलसिंकी- स्मार्टफोनचे उत्पादन मायक्रोसॉफ्ट कंपनीने थांबवण्याचे जाहीर केले असून १,८५० कर्मचा-यांना घरी पाठवले जाणार आहे. कंपनीच्या स्मार्टफोन उत्पादन व्यवसायाची ही अखेर आहे, असे फिनिश कामगार संघटनेने म्हटले आहे.

मायक्रोसॉफ्ट कॉर्प.ने कंपनीचे स्मार्टफोन हार्डवेअर व्यवसाय बंद करण्याचे जाहीर केले असून त्यामुळे १,८५० नोक-यांवर परिणाम होणार आहे. फिनलंडमधील १,३५० कर्मचा-यांच्या नोक-या रद्द करण्यात येतील. येथेच स्मार्टफोनची रचना करण्यात येते. जगभरातील ५०० नोक-या बंद केल्या जातील. मायक्रोसॉफ्ट आता स्मार्टफोनची रचना अथवा उत्पादन करणार नाही, असे मुख्य शॉप स्टेवर्ड काले किली यांनी सांगितले. मायक्रोसॉफ्ट आता फक्त सॉफ्टवेअर तयार करत राहणार आहे.

Leave a Comment