फॉक्सकॉन कंपनीत रोबोंमुळे ६० हजार कामगार बेकार

robot
आयफोन उत्पादन करणार्‍या फॉक्सकॉन कंपनीच्या चीनमधील कारखान्यांतून रोबो तैनात करण्यात आल्याने किमान ६० हजार कामगारांच्या नोकर्‍या गेल्या असल्याचे समजते. फॉक्सकॉनचे चीनमध्ये १२ कारखाने आहेत. सरकारी अधिकार्‍यानी दिेलेल्या माहितीनुसार कंपनीच्या कुनशान स्थित कारखान्यात १ लाख १० हजार कामगार होते तेथे आता रोबोंमुळे ५० हजार कामगारच काम करत आहेत. यामुळे कंपनीची लेबर कॉस्ट घटली आहे. येत्या कांही वर्षात या कंपनीच्या पावलावर पाऊल टाकून आणखी काही कारखान्यातही रोबो तैनात होतील.

कुनशान या शहरात आजमितीला २५ लाख नागरिक राहतात व त्यातील बहुसंख्य लोक इलेक्ट्राॅनिक कारखान्यांतच काम करतात. नोकरीसाठी अनेक जण येथे स्थलांतर करून आले आहेत. रोबोंमुळे या कामगारांवर बेकारी ओढविण्याची भीती व्यक्त केली जात आहे. कंपनीने मात्र जेथे बुद्धीचे काम नाही तेथेच रोबो काम करत असल्याचा खुलासा केला आहे. संशोधन, विकास व गुणवत्ता नियंत्रण ही कामे अद्यापीही माणसेच करत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

Leave a Comment