स्मार्टफोनच्या स्टोरेजची कटकट संपावी यासाठी दीर्घ प्रतीक्षा केल्यानंतर युजरसाठी ही समस्या सोडविणारा नेक्स्टबिट रॉबिन स्मार्टफोन भारतात बुधवारी लाँच केला गेला. या फोनचे लॉचिंग कंपनीचे सीईओ टॉम मॉस यांनीच केले असून या फोनची किंमत आहे १९९९९ रूपये. हा फोन फक्त फ्लिपकार्टवर मिळणार आहे. त्याचे बुकींग गुरूवारपासून सुरू होत आहे व मे ३० पासून डिलिव्हरी दिली जाणार आहे.
स्टोरेज समस्या सोडविणारा रॉबिन नेक्स्टबिट भारतात आला
गेल्या वर्षी आंतरराष्ट्रीय स्तरावर हा फोन सप्टेंबरमध्ये लाँच केला गेला आहे. तेथे त्याची किंमत २६ हजार रूपये आहे. या फोनला ५.२ इंची फुल एचडी स्क्रीन, ३ जीबी रॅम, ३२ जीबी मेमरी शिवाय १०० जीबीचे कलाउड स्टोरेज फ्री दिले गेले आहे. फिंगरप्रिट सेन्सर, १३ एमपीचा रियर व ५ एमपीचा फ्रंट कॅमेरा, यूएसबी सी पोर्ट, मार्शमेलो ६.० ओएस, सिंगल सिम अशी त्याची अन्य फिचर्स आहेत. हा फोन कोणत्याही टेलिकॉम नेटवर्कवर वापरता येतो. मिडनाईट व मिंट अशा दोन कलर व्हेरिएंटमध्ये तो उपलब्ध आहे.