मुंबई: मेड इन इंडिया गॅलेक्सी टॅब आयरिस मोबाईल उत्पादक कंपनी सॅमसंगने भारतात लाँच केला आहे. १३,४९९ रु. एवढी याची याची किंमत असून यामध्ये आधार, एसटीक्यूसी आणि यूआयडीएआय सर्टिफाइड बायोमॅट्रिक ऑथेन्टिकेशन फीचर देण्यात आले आहेत.
सॅमसंगने आणला ‘मेड इन इंडिया’ टॅब
आयरिस रिकॉग्निशन टेक्नोलॉजीवर हा टॅब आधारित असून ज्यामध्ये आधार कार्डची माहिती मिळविता येऊ शकते. या टॅबद्वारे बँकिंग आणि ई-गव्हरनेंससारख्या म्हणजेच पासपोर्ट, टॅक्स, हेल्थकेअर आणि पेपरलेस सर्व्हिस मिळू शकेल.
या टॅबलेटमध्ये ७ इंचाची स्क्रीन, १.२Ghz क्वॉड कोअर प्रोसेसरसोबत १.५जीबी रॅम आहे. यात इंटरनल मेमरी ८ जीबी देण्यात आली असून २००जीबीपर्यंत मेमरी वाढविता येऊ शकते. यामध्ये ४ मेगापिक्सलचा रिअर ऑटोफोकस कॅमेरा देण्यात आला आहे तर याची बॅटरी क्षमता ३६०० mAh आहे. यात ब्ल्यूटूथ, मायक्रो यूएसबी आणि ओटीजी सपोर्ट आहे. यामध्ये ड्यूल आय स्कॅनर असल्याचा कंपनीचा दावा आहे. मात्र हा टॅब कधी उपलब्ध होईल याबाबत कंपनीने अद्याप कोणतीही माहिती दिलेली नाही.