वाहतूक जॅममधून सुटका करणार्‍या इलेव्हेटेड बसेस

buss
शहरातून ट्रॅफिक जाम ही मोठीच समस्या निर्माण झाली आहे. जगातील सर्वाधिक लोकसंख्येचा देश असलेला चीन हाही या समस्येला अपवाद नाही. मात्र त्यावर तोडगा म्हणून येथील इंजिनिअर्सनी एलिव्हेटेड बस डिझाईन केली असून ती बिजिंग येथे भरलेल्या १९ व्या इंटरनॅशनल हायटेक एक्स्पो मध्ये सादर केली गेली आहे. या वर्षअखेरी या बसेस चीनमधल्या गर्दीवरच्या रस्त्यांवरून धावतील असेही समजते.

या एलिव्हेटेड बसची रचना अंडरपास सारखी केली गेली आहे. या मुळे ही बस रस्त्यावर असतानाही अन्य कार्स तिच्याखालून जाऊ शकतात. या बससाठी फिक्स ट्रॅक केले गेले आहेत. म्हणजे ट्रामसारखी ही बस रस्त्यावरून धावेल. तिच्यात एकावेळी १२०० प्रवासी प्रवास करू शकतात व त्यासाठी येणारा खर्च अन्य सार्वजनिक वाहनांच्या तुलनेत कमी आहे. १ वर्षात या रूटचे बांधकाम पूर्ण करण्यात येणार आहे. या बसच्या चाचण्या या वर्षाच्या दुसर्‍या सहामाहीत घेतल्या जाणार असून या बसेस या वर्षअखेर रस्त्यावर येतील.

Leave a Comment