आता ऑफिसमध्येही चिअरलिडर्स

cheatr
चिअरलिडर्स म्हटले की सर्वप्रथम डोळ्यासमोर येतात ते क्रिकेटचे सामने. मात्र या चिअरलिडर्स आता क्रिकेटपुरत्या मर्यादित राहणार नाहीत याचे संकेत दिले जात आहेत. चीनमधील एका टेक कार्यालयाने कर्मचार्‍यांच्या मनोरंजनासाठी अशा चिअरलिडर्स भाडे तत्त्वावर नेमल्या आहेत. व त्यामुळे कंपनीतील पुरूष कर्मचार्‍यांच्या कामात लक्षणीय सुधारणा झाल्याचा अनुभव कंपनी व्यवस्थापन घेत आहे.

या चिअरलिडर्सचे फोटो इंटरनेटवर व्हायरल झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार या कंपनीने टॅलंटेड चिअरलिडर्स कंपनीत नेमल्या आहेत. या चिअरलिडर्स कर्मचार्‍यांना कंटाळा आला असेल तर त्यांचे मनोरंजन करतात, त्यंाचा मूड ऑफ असेल तर तो ठीक करतात, त्यांच्याबरोबर चॅटिंग करतात, पिगपाँग खेळतात. यामुळे कर्मचार्‍याना मोटीवेशन मिळते व ते अधिक जोमाने व वेगाने त्यांची कामे पूर्ण करतात. कामाच्या ठिकाणचे वातावरण आनंदी ठेवण्यास या चिअर लिडर्स खूपच उपयोगी पडतात तसेच त्यांच्यामुळे कंपनीतील कर्मचार्‍यांचा आपसातील संवाद वाढतो परिणामी एकमेकांच्या सहकार्याने कामे निपटण्याकडे कर्मचार्‍यांचा कल वाढतो असाही अनुभव येत आहे.

Leave a Comment