भारतात नवा प्रकल्प उभारणार लेनोव्हा

lenova
नवी दिल्ली : भारतात व्यवसाय वृद्धीसाठी नवा उत्पादन प्रकल्प स्थापन करण्याचा विचार संगणक क्षेत्रातील आघाडीवर असलेली चिनी कंपनी लेनोव्हा करीत आहे. सध्या पुद्दुचेरी येथे एक स्वतंत्र उत्पादन प्रकल्प कंपनीचा आहे. या प्रकल्पाची मालकी ‘आयबीएम‘च्या पर्सनल संगणक व्यवसायाचे अधिग्रहण केल्यानंतर कंपनीकडे हस्तांतरित झाली होती. परंतू आता कंपनीला तेथील सरकारकडून मिळणारी कर सवलत संपल्याने कंपनी नव्या प्रकल्पाच्या शोधात असल्याची माहिती खासगी सुत्रांनी दिली आहे. वर्षाला १५ लाख पर्सनल संगणक लेनोव्हाच्या पुद्दुचेरी प्रकल्पात तयार केले जातात.

‘मेक इन इंडिया‘ प्रकल्पाला कंपनीच्या या निर्णयाचा फायदा होणार आहे. नव्या प्रकल्पासाठी कंपनी तेलंगणा, आंध्र प्रदेश व गुजरातचा विचार करीत आहे. शिवाय, कंपनीने छत्तीसगड आणि उत्तर प्रदेशातूनही पर्याय खुला ठेवला आहे. सध्या कंपनीची तेथील राज्य सरकारांशी बोलणी सुरु आहे. भारतात संगणक क्षेत्रात लेनोव्हा कंपनी आघाडीवर आहे. कंपनीचा संगणक बाजारपेठेत २०१५ वर्षाच्या शेवटच्या तिमाहीत २५.३ टक्के वाटा होता. परंतू आता कंपनी आपल्या स्मार्टफोन व्यवसायाच्या विस्तारासदेखील उत्सुक आहे.

Leave a Comment