गुगलच्या पॅरिस मुख्यालयावर करचोरी प्रकरणी छापा

google
पॅरिस – पॅरिस स्थित जगाचे सर्वात मोठे सर्च इंजिन गुगलच्या मुख्यालयावर फ्रेंच तपास अधिका-यांनी छापा टाकला. हा छापा गुगलवर करचोरीप्रकरणी पडला. फ्रान्सच्या अर्थ मंत्रालयानुसार गुगलद्वारे कर न भरण्यात आल्याप्रकरणी अधिका-यांनी हा छापा टाकला.

फ्रान्सच्या एका वृत्तपत्राच्या हवाल्याने या छापेमारीत जवळपास १०० अधिकारी सामील असल्याचे रॉयटरने वृत्त दिले. गुगलकडून याविषयी कोणतीही प्रतिक्रिया समोर आली नाही. फ्रान्स, ब्रिटन आणि इतर देशांमध्ये गुगल, याहू आणि अन्य मोठय़ा कंपन्यांना मोठा लाभ होत आहे. परंतु त्या प्रमाणात त्या करभरणा करत नाहीत असे अधिकृत तक्रारीत म्हटले गेले आहे. अमेरिकन कंपनी गुगलने मागीलवेळी फ्रान्सला १.६ अब्ज डॉलर्सचा कर दिला होता. तर जानेवारीत गुगल ब्रिटनला १३० दशलक्ष पौंड कर म्हणून देण्यास कंपनी तयार झाली होती. याबाबत ब्रिटनच्या संसदेत गुगलवर कठोर टीका देखील झाली.

Leave a Comment