होऊ शकतो जन-धन खात्याचा गैरवापर

jan-dhan
मुंबई – भारतीय रिझर्व्ह बँकेने जन धन खात्यांचा गैरवापर होऊ शकतो असा इशारा दिला आहे. या खात्यांमार्फत फसवणुकीची सर्वाधिक शक्यता असल्याचे बँकेने म्हटले आहे. या बाबत सुरक्षितता बाळगावी, जन धन खात्यांच्या व्यवहारावर लक्ष ठेवण्यासाठी योग्य व्यवस्था असावी, नव्याने उघडण्यात खात्यांचे व्यवस्थापन करण्यासाठी योग्य ती यंत्रणा उभारण्याची गरजही व्यक्त करण्यात आली आहे. रिझर्व्ह बँकेचे डेप्युटी गव्हर्नर एस् एस् मुंद्रा यांनी याबाबतचे धोके एका कार्यक्रमादरम्यान सर्वांच्या लक्षात आणले.

Leave a Comment