नोकिया नेक्स्ट भारतात देणार फाइव्ह जी नेटवर्क

nokia5
फिनलंडमधील नेटवर्क उपकरणे पुरविणारी नोकिया नेटवर्क ने फाईव्ह जी नेटवर्क सेवा देण्यासंदर्भात भारतीय टेलिकॉम कंपन्यांशी चर्चा सुरू केली असून या नेटवर्कच्या चाचण्या भारतात सुरू करण्यासही उत्सुकता दाखविली आहे. भारतात अद्यापी फोर जी नेटवर्क सेवाही सर्वदूर पोहोचू शकलेली नाही तोपर्यंतच नोकियाने फाईव्ह जी चाचण्या सुरू करण्याची तयारी केली आहे.

नोकिया नेटवर्कने अमेरिकी व्हेरीऑन, कोरियाई एस.के टेलिकॉम, व जपानच्या एनटीटी डोकोमो सारख्या ग्लोबल टेलिकॉम कंपन्यांसाठी फाईव्ह जीच्या चाचण्या यापूर्वीच सुरू केल्या आहेत. नोकिया नेटवर्कचे प्रमुख मिलीवोझ वेला या संदर्भात म्हणाले की फाईव्ह जी टेक्नॉलॉजी १०० एमबी स्पीडसाठी सक्षम आहे व २०२० पर्यंत व्यापारी स्वरूपात त्याची सुरवात होईल तेव्हा १०० पट अधिक डेटा वाहून नेण्याची तिची क्षमता असेल. नोकिया नेटवर्क ही फाईव्ह जी वर काम करणार्‍या टेलिकम्युनिकेशन स्टँडर्ड डेव्हलपमेंट सोसायटीचा भाग आहे.

Leave a Comment