जाहीर होणार कर बुडव्यांच्या नावे

cbdt
नवी दिल्ली – प्राप्तिकर विभागाने एक कोटींहून अधिक कर बुडविलेल्या व्यक्तींची नावे येत्या आर्थिक वर्षापासून जाहीर करण्याचा निर्णय घेतला आहे.

गेल्या वर्षापासूनच प्राप्तिकर विभागाने करचुकवेगिरी करणाऱ्यांची नावे वर्तमानपत्रांमधून जाहीर करण्यास सुरवात केली आहे. आतापर्यंत ६७ जणांची नावे जाहीर केली असून त्यांचे पत्ते, संपर्क, पॅन क्रमांक अशी माहिती छापण्यात येत आहे. मात्र, हे सर्व वीस ते तीस कोटी आणि त्याहून अधिक कर चुकविणारे आहेत. नव्या निर्णयामुळे एक कोटी आणि त्यापेक्षा अधिक रुपयांची करचुकवेगिरी करणाऱ्या व्यक्ती आणि कंपन्यांची नावे जाहीर करण्याचा निर्णय झाल्याने अनेक लोकांची नावे जाहीर होण्याची शक्‍यता आहे. ही नावे पुढील वर्षी ३१ जुलैपूर्वी जाहीर करण्यात येतील.

सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्‍ट टॅक्‍सेसने (सीबीडीटी) हा निर्णय जाहीर करणारे परिपत्रक जारी केले आहे. अनेक उपायांनीही ज्या करचुकवेगिरी करणाऱ्यांविरोधात पोचता येत नाही, त्यांची नावे जनतेला समजावीत, हा यामागील हेतू असल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले. ही सर्व नावे वृत्तपत्रांबरोबरच प्राप्तिकर विभागाच्या संकेतस्थळावरही प्रसिद्ध केली जाणार आहेत.

Leave a Comment