अॅपलच्या भारतात उत्पादन घोषणेने चीन धास्तावला

cook
अॅपलचे सीईओ टीम कूक यांनी भारतात पंतप्रधान मोदींची भेट घेऊन अॅपलला भारतात उत्पादन करण्यात रस असल्यचे सांगितल्यानंतर चीनला धडकी भरली असल्याचे दिसून आले आहे. कुक यांच्या घोषणेनंतर अनेक चीनी तज्ञांनी अॅपलचा हा निर्णय चीनसाठी धोक्याची घंटा असल्याचे मत व्यक्त केले आहे. अॅपलने त्यांची उत्पादन केंद्रे भारतात सुरू केली तर चीनमध्ये हजारो जणांवर नोकर्‍या गमावण्याची पाळी येणार आहे. व त्यावर अॅपल इंकला चीन निरोप देणार काय यावर जोरदार चर्चाही सुरू झाल्या आहेत.

टीम कुक यांनी मोदींबरोबर घेतलेल्या भेटीत अॅपलच्या भारतात उत्पादन प्रकल्पांबाबत सविस्तर चर्चा केली असून भविष्यकाळातील योजनाही जाहीर केल्या आहेत. त्यातच त्यानी भारतीय युवकांची क्षमता व त्यांचे कौशल्य यांची जोरदार तारीफ केली असून हे टॅलंट आम्ही उपयोगात आणण्यास उत्सुक असल्याचेही सांगितले आहे. कुक यांच्या विधानांमुळे चीन मध्ये जोरदार वादावादी सुरू झाली आहे.

यापूर्वीही पगारवाढीच्या मागण्यांमुळे चीनमधून अनेक कंपन्या बाहेर पडल्या आहेत. परदेशी कंपन्यांना आशियाई देशात स्वस्त मनुष्यबळ उपलब्ध होते व म्हणून त्यांची आशियाई देशांना पसंती असते. चीनमध्ये पूर्वी खूपच स्वस्तात मनुष्यबळ उपलब्ध होत होते त्यामुळे तेथे अनेक कंपन्यांनी आपली उत्पादन केंद्रे सुरू केली होती. मात्र पगारवाढीमुळे तसेच अनेक निर्बंधामुळे या कंपन्या चीनमधून बाहेर पडल्या. अॅपलही त्याच मार्गावर असून अॅपलचा कोणताही निर्णय चीनसाठी महागात पडणारा असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.

Leave a Comment