संशोधकांनी बनविले पारदर्शी लाकूड

wood
युनिव्हर्सिटी ऑफ मेरिलँडमधील संशोधकांनी लाकडाच्या तुकड्याचा कायापालट करण्यात यश मिळविले आहे. रासायनिक क्रियेच्या मदतीने त्यांनी लाकडाला काचेसारखे पारदर्शक व अधिक मजबूत बनविण्यात यश मिळविले आहे. पर्यावरणाच्या दृष्टीनेही हे लाकूड प्लॅस्टीकपेक्षाही कमी हानी पोहोचविणारे आहे. त्यामुळे इमारती बांधताना जेथे लाकडाचा मुबलक वापर केला जातो तेथे हे लाकूड क्रांती घडवेल असा संशोधकांचा दावा आहे.

मिळालेल्या माहितीनुसार संशोधकांनी लाकडाच्या या तुकड्यावर प्रथम कांही रासायनिक क्रिया करून त्याचा रंग गायब केला. त्यामुळे हे लाकूड पारदर्शी बनले. त्यानंतर त्याला मजबूत करण्यासाठी या लाकडात इपोक्सी इंजेक्ट करण्यात आले. यामुळे हे लाकूड भक्कम बनले असे समजते. बांधकाम क्षेत्रात यामुळे लाकडाला एक नवा व भक्कम पर्याय उपलब्ध झाला आहे.

Leave a Comment