मार्च २०१७ पासून सुरू होणार टपाल विभागाची ‘पेमेंट बँक’

post
हैदराबाद – मार्च २०१७ पासून भारतीय टपाल खात्याची पेमेंट बँक सुरू करण्यात येणार असून, याच्या अंतर्गत अनेक आर्थिक सेवा देण्याचा प्रयत्न करण्यात येईल. त्यामुळे भारतीय टपाल खात्यामध्ये सुधारणांसाठी मोठा वाव निर्माण होणार असल्याचे माहिती तंत्रज्ञान आणि केंद्रीय दूरसंचार मंत्री रविशंकर प्रसाद यांनी सांगितले.

लवकरच मंत्रिमंडळात पेमेंट बँकेबाबतचा प्रस्ताव सादर करण्यात येणार असून या माध्यमातून थर्ड पार्टीची उत्पादने आणि सेवा विकण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. जागतिक बँक, अमेरिकन सिटी समूह आणि ब्रिटनच्या बार्कलेझ या विदेशी कंपन्यांसह इतर ८० कंपन्या टपाल खात्याच्या पेमेंट बँकेसोबत भागीदारी करण्यासाठी उत्सुक आहेत. थर्ड पार्टी सेवा म्हणजे, इन्शुरन्स उत्पादने, म्युच्युअल फंड, बॅकिंग साधने आणि आर्थिक सेवा बँकेतून देण्यात येणार आहेत. यामुळे टपाल विभागाची वेगळी ओळख निर्माण होण्यास मदत होणार आहे.

Leave a Comment