नवीन अँड्राईड ओएस केरळी मिठाईच्या नावाने येणार?

neyyappa
गुगलच्या अँड्राईड ऑपरेटिंग सिस्टीमची नवी व्हर्जन नेहमीच गोड पदार्थाच्या नावावरून सादर केली गेली आहेत. डोनट, एक्लेअर, फ्रोयो, जिजरब्रेड, हनीकोंब,जेलीबीन, किटकॅट, लॉलीपॉप व आता मार्शमेलो ही त्याची उदाहरणे. गुगल त्यांचे नवीन अँड्राईड एन लाँच करत असून त्यासाठी केरळी पदार्थ नेयप्पम हे नांव आघाडीवर असल्याचे समजते.

गुगलचे सीईओ सुंदर पिचाई भारत भेटीवर आले असताना चेन्नई आयआयटीतील विद्यार्थ्यांच्या एका प्रश्नाला उत्तर देताना त्यानी या पुढच्या अँड्राईड ओएसला भारतीय मिठाईचे नांव देऊ असे मजेत सांगितले होते. मात्र भारतीयांनी ही बाब गंभीरपणे घेऊन जेव्हा अँड्राईड एन साठी मिठाईची नांवे सुचविण्यासाठी सूचना मागविल्या गेल्या तेव्हा मल्याळी नेयप्पन चे नांव अनेकांनी सुचविले इतकेच नव्हे तर केरळी जनतेने त्यासाठी कँपेनही सुरू केले आहे. त्याला सोशल मिडीयावर चांगले समर्थनही मिळते आहे.

तांदूळ, गुळ, नारळ व तुप वापरून हा पदार्थ केला जातो. यापूर्वी लॉलिपॉप व किटकॅटसाठी भारतीयांनी लाडू व काजू कतलीची नांवे सुचविली होती मात्र त्यावेळी ती निवडली गेली नाहीत. गुगल सीईओ पिचाई भारतीय वंशाचे असल्याने यंदा मात्र भारतीयांची ही अपेक्षा पूर्ण होईल असा अंदाज केला जात आहे.

Leave a Comment