आधुनिक अमेरिकेत आजही नाहीत या सुविधा

bullet
जगातील सर्वाधिक ताकदवान देश म्हणून अमेरिकेचा दबदबा असला तरी अशा कांही सुविधा आहत ज्या अन्य देशांत आहेत मात्र अमेरिकेत नाहीत. ऐकून कदाचित आश्वर्य वाटेल पण अतिवेगवान गाड्याची दिवानी असलेली अमेरिका बुलेट ट्रेन पासून वंचित आहे. तसेच येथे वॉटर वेज नाहीत, अंडर वॉटर वे नाहीत.

बुलेट ट्रेन भारतासारख्या देशातही २०२० पासून सुरू होत आहे. मात्र अमेरिकेत बुलेट ट्रेन नाही. बुलेट ट्रेनची सुरवात जपानमध्ये १९६४ साली टोक्यो ऑलिंपिकच्या वेळी प्रथम झाली. अमेरिकेत मात्र आजही बुलेट ट्रेन नाही. त्यामागे अमेरिकेत विमान सुविधा चांगली असल्याचे कारण दिले जाते आहे.

जहाज बांधणी- अनेक विमानवाहू नौका पदरी बाळगणार्‍या अमेरिकेत जहाज बांधणी होत नाही. या क्षेत्रात आशिया व युरोपमधील कंपन्या आघाडीवर आहेत मात्र टॉप टेन जहाज बांधणी कंपन्यात अमेरिकेचा समावेश नाही. क्रूझ बांधणीतही नॉर्वे व स्वीडन हे देश आघाडीवर आहेत.

waterway
गार्बेज एनर्जी क्षेत्रातही अमेरिका मागास आहे. सर्वाधिक कचरा निर्माण करणार्‍या या देशांत कचर्‍यापासून वीज निर्मिती मात्र केली जात नाही. रिसायकलींग क्षेत्रात अमेरिका खूपच मागे असून युरोपमधील स्वीडन व नॉर्वे या देशांनी येथेही आघाडी घेतली आहे. स्वीडन तर शेजारी देशांचा कचरा घेऊनही त्यापासून वीज निर्मिती करते व या देशातील ९९ टक्के वीज कचर्‍यापासूनच बनविली जाते.

वॉटर ब्रिज ही अमेरिकेत दुर्मिळ असून युरोपने येथेही आघाडी घेतली आहे. जगातला पहिला वॉटर ब्रिज मॅकबर्ग हा आहे. जर्मनीतील वॉटरब्रिज वरून मोठमोठी जहाजेही जातात. व्हीक्टोरियन काळातले २ वॉटरब्रिज ब्रिटनमध्येही आहेत.

अंडरवॉटर वे- वॉटर ब्रिजच्या उलट हा प्रकार. येथे समुद्राखालून वाहतूक केली जाते. अमेरिकेत हा प्रकारही पाहायला मिळत नाही. युरोपत अंडर वॉटर वे मोठ्या प्रमाणावर वापरात आहेत. लंडनच्या इंग्लीश चॅनलमधून पॅरिस पर्यंत जाणारी रेल्वे लाईन समुद्राखालून नेली गेली आहे. नॉर्वे जपानमध्येही असे मार्ग आहेत व आता मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेनचा काही मार्गही समुद्राखालच्या बोगद्यातून जाणार आहे.

Leave a Comment