अमेरिकेत १८ व्या वर्षी डॉक्टर होणार भारतीय वंशाचा मुलगा

tanishq
मुंबई – वैद्यकीय प्रवेश परीक्षा भारतीय वंशाच्या १२ वर्षीय मुलाने पास केली असून वयाच्या १८ व्या वर्षी तो कॅलिफोर्निया विद्यापीठातून वैद्यकीय क्षेत्रातील पदव्युत्तर पदवी घेणार आहे.त्याने हे यश सर्वात कमी वयात संपादन केल्याने अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी त्याचे अभिनंदन केले आहे. तनिष्क अब्राहम असे त्या मुलाचे नाव असून तो मुळचा केरळमधील आहे.

वयाच्या अकराव्या वर्षी तनिष्क अब्राहम याने अमेरिका रिव्हर कॉलेजमधून पदवीधर झाला. त्याने एकाच वर्षी ३ पदव्या प्राप्त केल्या होत्या. यावेळी प्रवेश प्रक्रियेत १८०० मुलांमधून त्याने अव्वल स्थान पटकावले होते. हायस्कूल मधून पदवीधर होणारा तो अमेरिकेतील एकमेव विद्यार्थी ठरला आहे. त्याच्या या यशाने प्रभावित होऊन अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी त्याचे पत्र पाठवून अभिनंदन केले. तनिष्कने वयाच्या ७ व्या वर्षीच स्टेट परिक्षा २०१४ मध्ये पास केली होती. त्याचवेळी त्याने हायस्कूल डिप्लोमाही प्राप्त केला. सध्या तनिष्कने मेनसा या आयक्यु सोसायटीचे सभासदत्व प्राप्त केले असून त्याला अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष होण्याची इच्छा आहे. तनिष्कची आई ताजी ही पशू वैद्यकीय चिकीत्सक तर, त्याचे वडील बिजाऊ अब्राहम हे सॉफ्टवेअर इंजीनिअर आहेत.

Leave a Comment