व्हीडीओ कमेर्‍यासह आला टूथब्रश

brush
दैनंदिन वापराच्या वस्तूंमध्ये व्हिडीओ कॅमेरे बसविण्याचा ट्रेंड वाढत चालला असतानाच सिएटल कंपनीने छोटासा कॅमेरा बसविलेला टूथ ब्रश बाजारात आणला आहे. प्रोफिक्स नावाचा हा ब्रश दंतवैज्ञ क्रॅग कोस्लर यांनी तयार केला असून गुरूवारपर्यंत तो ऑफर मध्ये २९९ डॉलर्समध्ये मिळणार आहे.२०१७ साली हा ब्रश अधिकृत स्वरूपात बाजारात दाखल होईल तेव्हा त्याची किंमत असेल ३९९ डॉलर्स.

दंतवैज्ञ क्रेग यांच्या म्हणण्यानुसार या ब्रशने दात घासताना तोंडाच्या आतील भागाचे चित्रण केले जाईल व ते लाईव्हही पाहता येईल. या ब्रशमधून स्मार्टफोनकडे व्हिडीओ पाठविण्यासाठी ब्ल्यू टूथ, वायफाय चा वापर केला गेला आहे. तोंडाच्या आतली साफसफाई कशी झाली आहे, तसेच हिरड्यांच्या रंगात कांही बदल नाही ना, गालफडांच्या आतल्या बाजूला कांही डाग नाहीत ना हे सर्व यातून पाहता येईल. असे कांही आढळलेच तर त्याचे स्वतंत्रपणे फोटोही काढता येतील.

आजकाल पेन, बांगड्या, ब्रेसलेट, हेअरबँड, कंगवे, बॅग अशा रोज वापराच्या वस्तूंतही व्हीडीओ कॅमेरे बसविले जात आहेत. टूथ ब्रश मधला हा कॅमेरा तुमच्या तोंडाचे आरोग्य कसे आहे हे तुम्हाला प्रत्यक्षातच दाखवेल असाही या डॉक्टरांचा दावा आहे.

Leave a Comment