टाटा मोटर्सचा इराण मध्ये कार कारखाना

tata
भारतातील अग्रणी कार कंपनी टाटा मोटर्स इराणमध्ये पेट्रोल कार असेंब्लीसंदर्भात तेथील स्थानिक कंपनीबरोबर चर्चा करत असून येत्या दोन वर्षात हा कारखाना सुरू होईल असे सांगितले जात आहे. इराणवरील प्रतिबंध उठल्यानंतर तेथे वेगाने वाढत चाललेल्या बाजाराचा लाभ उठविण्यासाठी हा प्रयत्न सुरू असल्याचे समजते. त्यानुसार इराणच्या खोदरो कंपनीबरोबर संयुक्त भागीदारीत टाटा हा कारखाना सुरू करणार आहे.

या कारखान्यात टाटांच्या नव्या टियागो, बोल्ट, झेस्ट सह अन्य पेट्रोल कारची असेंब्ली केली जाईल. त्यासाठीचे सुटे भाग भारतातून आयात केले जाणार आहेत. खोदरो कंपनीच्या विक्री नेटवर्कचा वापर टाटा त्यांच्या कारविक्रीसाठी करून घेणार आहे. मात्र कारचे ब्रँडींग टाटांच्या नावानेच केले जाईल असेही समजते.खोदरो ही कॉन्ट्रॅक्ट मॅन्युफॅक्चरिंग कंपनी असून येथे सध्या चीनी कारचे मॅन्युफॅक्चरिंग केले जात आहे. त्यापूर्वी १९६२ ही कंपनी सुरू झाल्यानंतर तेथे पेकान व फ्रान्सच्या प्युजो व सेदान चे उत्पादन केले गेले होते.

तेहरान व मसाद जवळ टाटाच्या भागीदारीने उभारण्यात येत असलेल्या कारखान्यात २०१८ पासून उत्पादन सुरू होणार असून सुरवातीला १ लाख कार असेंबल केल्या जातील व त्यानंतर हे प्रमाण वाढविले जाईल असेही समजते.

Leave a Comment