कर्करोग मुक्तीकडे…

cancer
कर्करोग हे अजूनही मानवासमोरचे आव्हान ठरले आहे. तो कसा होतो आणि नेमका कशामुळे होतो याचे आकलन अजून झालेले नाही. त्यामुळे कर्करोगावर औषधही सापडलेले नाही. तेव्हा कर्करोगापासून बचाव करून घ्यायचा असेल तर प्रतिबंधात्मक उपायच शक्य आहे आणि तज्ञांच्या मते जीवनपध्दती बदलली तर कॅन्सरचा धोका टळू शकतो. कारण कॅन्सर हा जीवनपध्दतीतून विकसित झालेला विकार आहे. त्यांच्या मते मद्यप्राशन टाळले, धूम्रपान टाळले, रोज व्यायाम केला आणि बॉडी मास इंडेक्स सांभाळले तर कॅन्सर होणार्‍या रुग्णांच्या संख्येत एवढ्या एका गोष्टीवरून २० ते ४० टक्के एवढे प्रमाण कमी होईल. या तज्ञांच्या मते माणसाचा बॉडी मास इंडेक्स म्हणजे वजन आणि उंची यांचे प्रमाण दाखवणारा निर्देशांक हा १८.५ ते २७.५ च्या दरम्यान राखण्यात यश आले तर कॅन्सरला दूर ठेवता येते.

या तज्ञांनी कॅन्सरला दूर ठेवण्यासाठी आठवड्यातून १५० मिनिटे व्यायाम केला पाहिजे. त्यातला ७५ मिनिटांचा व्यायाम हा जोरकसपणे केलेला असला पाहिजे. अमेरिकेत या संबंधात बोस्टन विद्यापीठात संशोधन करण्यात आले. ८९ हजार महिला आणि ४६ हजार पुरुष यांची कर्करोग आणि व्यसने या संबंधात निरीक्षणे करण्यात आली. तेव्हा त्यातून या गोष्टी निष्पन्न झाल्या. धूम्रपान न करणे, मद्यपान टाळणे, व्यायाम करणे आणि बॉडी मास इंडेक्स सांभाळणे या चार गोष्टी करणार्‍या व्यक्तीला कर्करोग होण्याची शक्यता जवळजवळ नसतेच. त्यामुळे या गोष्टींवर लक्ष केंद्रीत करून सर्वांनी कर्करोगापासून दूर राहिले पाहिजे.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment